पिंपळनेर : आ. मंजुळा गावितांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार | पुढारी

पिंपळनेर : आ. मंजुळा गावितांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील खरडबारी येथे चक्रीवादळात सापडून जखमी झालेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, डॉ. तुळशिराम गावित, महानगरप्रमुख सतीश महाले यांनी कै. भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयात भेट दिली. मतदारसंघातील रुग्णांची विचारपूस करीत असताना वैद्यकीय महाविद्यालयातील अस्वच्छतेचे दर्शन घडले.

हिरे मेडिकल महाविदयालयाचे डॉ. अरुण मोरे, मुकर्रर खान व इतर अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत विचारपूस करण्यात आली असता ते निरुत्तर झाले. महाविद्यालयीन सर्व परिसरातच अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली असल्याने आ. मंजुळा गावित यांनी वैद्यकीय सूत्रांकडे नाराजी व्यक्त केली. तसेच तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेत अस्वच्छतेबाबत तक्रार केली. जिल्हाधिकारी यांनी तातडीने महाविद्यालयाच्या वैद्यकीय सूत्रांना बोलावून स्वच्छता मोहीम तातडीने राबविण्याबाबत सूचना दिल्या. आमदारांच्या अचानक भेटीमुळे प्रशासन जागे झाले असून, जिल्हाधिकारी यांनी तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. तसेच दि.१६ सप्टेंबरला स्वत: जिल्हाधिकारी धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, प्रभारी अधिष्ठाता वैद्यकीय अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, महानगरपालिकेचे आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, आमदार मंजुळा गावित, डॉ. तुळशिराम गावित, सतीश महाले व अन्य अधिकाऱ्यांसह पाहणी करणार आहेत. रुग्णालयाच्या साफसफाई व स्वच्छतेच्या अनुषंगाने करावयाच्या उपायासंदर्भात प्रभारी अधिष्ठाता यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व विभागप्रमुखांना परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा:

Back to top button