चिकन ६५ : चकना, मेनकोर्स, स्टार्टर कशालाही चालणारा हा पदार्थ शोधला तरी कुणी? | पुढारी

चिकन ६५ : चकना, मेनकोर्स, स्टार्टर कशालाही चालणारा हा पदार्थ शोधला तरी कुणी?

चिकन ६५ : चकना, मेनकोर्स, स्टार्टर कशालाही चालणारा हा पदार्थ शोधला तरी कुणी?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : शहरात कुठेही भटकंती करताना हमखास नजरेस पडणारे स्टॉल असतात ते चिकन ६५चे! चटकदार, गरमागरम अशी ही डिश कढईतून प्लेटमध्ये आणि प्लेटमधून डायरेक्ट तोंडात असा प्रवास करणाऱ्या जे काही टेस्टी पदार्थ आहेत, त्यातील एक म्हणजे चिकन ६५. चिकन ६५ हे नाव बरेच विचित्र वाटते. एखाद्या गाडीच्या नंबर प्लेटसारखे नाव खाद्यपदार्थाला कोण देईल? चिकन ६५ हे नाव कसे मिळाले असेल या मागे दोन कारणं सांगितली जातात आणि बऱ्याच अफवाही आहेत.

सगळ्यात पटणारी अशी दोन कारणं आहेत. एक म्हणजे चेन्नईतील एक हॉटेलचे मालक ए. एम. बुहारी यांनी १९६५ला ही डिश सर्वप्रथम  बनवली म्हणून या डिशला चिकन ६५ हे नाव मिळाले. या हॉटेलने त्यानंतर विविध वर्षांत चिकनच्या काही डिश बनवल्या आणि त्या-त्या वर्षांची नावे दिले; पण यातील चिकन ६५ हे जास्त प्रसिद्ध झाले. चिकन ७८, चिकन ८२, चिकन ९० अशा काही डिश या हॉटेलने शोधल्या.

Chicken 65दुसरे अजून एक कारण सांगितले जाते ते असे. चेन्नईतील सैनिक कँटिनमध्ये मेन्यू कार्डवर बऱ्याच डिश असायच्या. यातील ६५व्या नंबरची ही चिकनची डिश होती. त्यावरून याला चिकन ६५ असे नाव पडले.

बाकीच्या अफवाही बऱ्याच आहेत. चिकन ६५ही डिश बनवण्यासाठी ६५ मिरच्या वापरल्या जातात, दुसरी अफवा अशी की, याचा मसाला बनवण्यासाठी ६५ दिवस लागतात, तर अजून एक थाप अशी की, चिकनचे ६५ तुकडे केले जातात म्हणून याला चिकन ६५ म्हणतात.

चिकन ६५ आता जरी देशाच्या बऱ्याच भागात मिळत असली तरी ही मुळची डिश दक्षिण भारतातील आहे. प्रत्येक राज्यात या डिशची चव वेगळी असते. आंध्रा स्टाईल चिकन ६५, केरळा स्टाईल चिकन ६५, कर्नाटक स्टाईल चिकन ६५ असे विविध प्रकार या डिशचे पाहायला मिळतात. तामिळनाडूत चिकन ६५ला कोरी सुक्का असेही नाव आहे. आंध्र प्रदेशातील चिकन ६५ जास्त मसालेदार असते आणि ते फ्राय न करता शिजवून बनवले जाते. तर कर्नाटकातील चिकन ६५मध्ये नारळाचा वापर होfतो.

हेही वाचलं का?

Back to top button