श्रीरामपूर : मुस्लिम तरूणीशी विवाह केल्याने हिंदू तरूणाची हत्या

crime
crime

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी तरूणाने मुस्लिम समाजातील मुलीची प्रेम विवाह केल्याने त्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे.  भोकर येथील दिपक बर्डे या तरूणाने याच परिसरातील एका मुस्लिम तरूणीशी पळून जाऊन महिनाभरापूर्वी विवाह केला. विवाह केल्यानंतर हे दोघेही आठवडाभर बाहेर राहिले. या विवाहाची माहिती  मुलीच्या भावांना कळाली. यानंतर त्यांनी या दोघांचा शोध घेतले.  या मुलीला तिचे भाऊ घरी घेऊन गेले. यानंतर या मुलीस पुणे येथील तिच्या मामाच्या घरी पाठविण्यात आले. आपली पत्नी पुणे येथे राहात असल्याची खबर दिपक याला कळाली. त्यांनी आपल्या मित्रांद्वारे पुणे येथे नोकरी शोधण्यासाठी सांगितले.

दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी दिपक याला (सुपे, ता. पारनेर) या ठिकाणी बोलावून घेतले. यानंतर दिपक याने आपण पुणे येथे नोकरीस जाण्यास जात असल्याचे सांगत असल्याचे घरी सांगितले. यानंतर दीपक घरी आलाच नाही.  आपला मुलगा घरी न आल्याने मुलाच्या आई-वडिलांनी पोलिस ठाणे गाठले. परंतु पोलिसांनी त्यांची केवळ बोळवण केली. सदरची बाब ही हिंदू संघटनांना कळाली. यानंतर या प्रकरणाने गती घेतली. हिंदूत्ववादी संघटनांनी पोलिसांना निवेदन देऊन दिपक याचा शोध घेण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी प्रथम चार आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी करूनही कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

त्यामुळे हे प्रकरण चिघळले. या प्रकरणी आ. नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात अवाज उठविला. यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूरात जन अक्रोश मोर्चा काढण्यात आला. अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांनी दिपक याचा लवकरच शोध घेण्याचे अश्वासन यावेळी दिले.  या सर्व घडामोडीनंतर तपासाला गती मिळाली. अटक केलेल्या आरोपींकडून कसून चौकशी केल्यानंतर आणखी तीन आरोपींची नावे पुढे आली. या तिघांनाही पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतल्यानंतर त्यांचीही चौकशी झाली. अखेर सर्वच आरोपींनी दिपक बर्डे याचा खून करून त्याचा मृतदेह गोदावरी नदीवरील कमालपूर बंधारा (ता. श्रीरामपूर) या ठिकाणाहून नदीपात्रात फेकल्याची कबुली दिली.

दिपक याचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी सध्या मोठी शोध मोहिम सुरू केली आहे. दहा स्पिड बोटींसह 80 अधिकारी- कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून त्याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. सदरचे पाणी हे जायकवाडी धरण (ता. पैठण, जि. औरंगाबद) या धरणात जात असल्याने या धरणातही त्याचा शोध सुरू आहे. जायकवाडी धरण उथळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ आहे. त्यामुळे दिपक याचा मृतदेह गाळात अडकल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. कमालपूर बंधारा ते जायकवाडी धरण हे अंतर जवळपास 70 कि. मी. आहे.

घटनेतील आरोपींची नावे
मजनू बबन शेख, समीर अहमद शेख, इम्रान अब्बास शेख, अजिम बबन शेख, राजू बबन शेख (सर्व रा. खोकर ता. श्रीरामपूर) सोनू शेख (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर), रमजान रफीक शेख (वाघोली, पुणे) असे आरोपींची नावे आहेत.

आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी
दिपक हा घरी येईल, अशी अपेक्षा धरून त्याचे आई-वडिल त्याचे वाट पाहत आहे. दिपक हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. दिपक याचा खून झालेला असेल तर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news