मविप्र निवडणूक : दोन्ही पॅनलकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा, आज फुटणार प्रचाराचा नारळ | पुढारी

मविप्र निवडणूक : दोन्ही पॅनलकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा, आज फुटणार प्रचाराचा नारळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात, मविप्र पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र शुक्रवारी (दि.19) माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. संस्थेची सत्ता काबीज करण्यासाठी प्रगती पॅनलविरुध्द परिवर्तन पॅनल अशी सरळ लढत होणार आहे. दोन्ही पॅनलकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (दि.20) सय्यद पिंप्रीपासून सत्ताधारी प्रगती पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. तर विरोधकांच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ चांदोरीतील हनुमान मंदिरातून होणार आहे.
मविप्र संस्थेच्या 24 जागांसाठी पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सभापती व उपसभापती या सहा प्रमुख पदांसह दोन महिला संचालक, 13 तालुका संचालक आणि तीन सेवक संचालक आदी पदांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी नीलिमा पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनल तर अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल आमने-सामने आले आहेत. दोन्ही पॅनलकडून मातब्बर उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.

प्रगती पॅनलकडून विद्यमान आठ पदाधिकारी व तालुका संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर उर्वरित जागांसाठी नव्याने उमेदवार देण्यात आला आहे. परिवर्तन पॅनलकडूनही दिग्गज उमेदवारांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. सरचिटणीस पदासह अध्यक्ष आणि सभापतिपदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. सिन्नर तालुक्यातून प्रथमच पदाधिकारी पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. सर्वाधिक मतदार असलेल्या निफाड तालुक्यातून सर्वाधिक उमेदवार देण्यात आले आहेत. दोन्ही पॅनलकडून उमेदवारी देताना निफाडला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.

असे आहेत प्रगती पॅनलचे उमेदवार
अध्यक्ष- डॉ. सुनील ढिकले, सभापती- माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस- नीलिमा पवार, उपाध्यक्ष- दिलीप मोरे , उपसभापती- डॉ. विलास बच्छाव, चिटणीस- डॉ. प्रशांत पाटील, तालुका संचालक, इगतपुरी- भाऊसाहेब खातळे, कळवण- धनंजय पवार, दिंडोरी- सुरेश कळमकर, नाशिक शहर- नाना महाले, बागलाण- विशाल सोनवणे, निफाड- दत्तात्रय गडाख, नांदगाव- चेतन पाटील, चांदवड- उत्तमबाबा भालेराव, देवळा- केदा आहेर, मालेगाव- डॉ. जयंत पवार, सिन्नर- हेमंत वाजे, येवला- माणिकराव शिंदे, नाशिक ग्रामीण- सचिन पिंगळे, महिला राखीव गट, 1) सरला कापडणीस, 2) सिंधूबाई आढाव.

असे आहेत सेवक संचालक पदाचे उमेदवार
सेवक पॅनल ः संजय शिंदे – महाविद्यालय विभाग, चंद्रजित दयाराम शिंदे प्राथमिक व माध्यमिक विभाग, जगन्नाथ मधुकर निंबाळकर – प्राथमिक व माध्यमिक विभाग.
समर्थ पॅनल ः प्राचार्य डॉ. संपतराव काळे- महाविद्यालय विभाग, रामराव बच्छाव- प्राथमिक व माध्यमिक विभाग, राजेश शिंदे- प्राथमिक व माध्यमिक विभाग.

असे आहेत परिवर्तन पॅनलचे उमेदवार
अध्यक्ष: अ‍ॅड.माणिकराव कोकाटे, उपाध्यक्ष: विश्वास मोरे, सभापती : बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती: देवराम मोगल, सरचिटणीस : अ‍ॅड. नितीन ठाकरे, चिटणीस : दिलीप दळवी महिला सदस्य 1) शोभा बोरस्ते 2) शालन सोनवणे तालुका संचालक इगतपुरी : संदीप गुळवे, कळवण : रवींद्र देवरे , दिंडोरी : प्रवीण जाधव, नाशिक शहर : लक्ष्मण लांडगे, बागलाण : डॉ. प्रसाद सोनवणे, निफाड : शिवाजी गडाख, नांदगाव : अमित पाटील (बोरसे), चांदवड : सयाजी गायकवाड, देवळा : विजय पगार, मालेगाव : अ‍ॅड. रमेशचंद्र बच्छाव, सिन्नर : कृष्णाजी भगत, येवला : नंदकुमार बनकर, नाशिक ग्रामीण : रमेश पिंगळे.

हेही वाचा :

Back to top button