जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वांनी तयारी सुरू केली असली तरी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीला एकनाथ खडसे व गिरीश महाजन उपस्थित राहणार नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र बैठकीला सुरवात झाल्यानंतर काही काळाच्या अंतराने दोन्ही नेते प्रथमच एकत्र आले होते. या बैठकीत 8 जणांची सर्वपक्षीय कोअर कमेटी स्थापन करण्यात आली.
कमेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, भाजपकडून आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश गोरे काँग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप भैया पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीत या कोअर कमिटीला सर्व अधिकार देण्यात आले. मात्र जागावाटपात बाबत कोणतीही चर्चा या बैठकीत झाली नाही
ही सहकार क्षेत्राचे निवडणूक असून जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे ती अबाधित राखण्यासाठी हा आमचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले मागच्या काळात सर्वांनी सर्वपक्षीय त्यांना दुजोरा दिला होता तोच निर्णय आता सुद्धा होईल अशी आशा व्यक्त त्यांनी केली बँकेला पुढच्या करत चांगली स्थिती यावी हीच इच्छा आहे असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
महाजन यांनी निवडणूक बिनविरोध होणार असा विश्वास व्यक्त केला
सहकारात राजकारण नको म्हणून गेल्या पाच वर्षाचा अनुभव घेतला असता सातत्याने जिल्हा बँकेने नफा कमावला आहे तर राज्यातील काही बँक अवसायनात गेल्या आहेत. बँकेला पुन्हा अधिक प्रगती व्हावी म्हणून सर्वपक्षीय निवडणूक निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
हे ही वाचलं का?