जळगाव : मुक्ताईनगरच्या जवानाला काश्मीरला वीरमरण! | पुढारी

जळगाव : मुक्ताईनगरच्या जवानाला काश्मीरला वीरमरण!

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील रहिवासी नायब सुभेदार विपीन जनार्दन खर्चे यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. त्‍यांचे पार्थिव गावी आणल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर शासकिय इतमामात अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत. ते जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते.

नायब सुभेदार विपीन जनार्दन खर्चे हे सेवा बजावत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्‍याने त्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेने निमखेडी गावात शोककळा पसरली आहे. विपीन हे मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील मुळ रहिवासी आहेत. भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून ते कार्यरत होते. ते जम्मू-काश्मिर येथे सेवा बजावत होते. दरम्‍यान ते उधमपूर येथे सेवेत असताना त्यांचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना विरमरण प्राप्त झाले आहे. त्‍यांचे पार्थिव गावी आणल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर शासकिय इतमामात अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button