अलमट्टी धरण ९५ टक्के भरले; ७२ हजार क्युसेक विसर्ग सुरू | पुढारी

अलमट्टी धरण ९५ टक्के भरले; ७२ हजार क्युसेक विसर्ग सुरू

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: गेल्या तीन दिवस कोसळणार्‍या पावसामुळे अलमट्टी धरणातून सोमवारी (दि.८) सकाळी ११ वाजल्यापासून तब्बल ७२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. अलमट्टी धरण आता ९५ टक्के भरले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अलमट्टी धरणातून सहा हजार क्युसेक विसर्ग ठेवण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी ८ वाजता ४२ हजार क्युसेक त्यानंतर सकाळी ११ पासून ७२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. अलमट्टी धरणाची क्षमता 123.01 टीएमसी असून,या धरणामध्ये सद्या 117.376 टीएमसी पाणीसाठा आहे. हे धरण आता 95.41 टक्के भरले आहे. धरणात 37 हजार 41 क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button