Dhule : जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने वार, पत्नीने जागीच सोडला जीव | पुढारी

Dhule : जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने वार, पत्नीने जागीच सोडला जीव

पिंपळनेर, (धुळे) पुढारी वृत्तसेवा :

धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यातील लखाळे या गावात पत्नीने जेवण बनविले नाही, याचा राग आल्याने पतीने लाकडी दांडक्याने पत्नीच्या डोक्यावर वार केला व हा फटका इतका जोरात बसला की त्या महिलेने जागीच जीव सोडला. मयत महिलेच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिल्याने आरोपीला अटकही झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लखाळे पो. वार्सा येथील गणेश एकनाथ चव्हाण या तरुणाचा प्रेमविवाह झाला असून त्याला चार अपत्य आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या इमारतीच्या ओट्यावर आहे. (दि. १२ ) रात्री साडेआठच्या सुमारास पत्नी निर्मला हिने जेवण बनविले नाही, त्यामुळे गणेशला राग आला. या रागातून दोघांचे भांडणही झाले. राग अनावर झाल्याने गणेशने लाकडी दांडक्याने निर्मलाच्या तोंडावर व डोक्यावर वार केला. यात, डोक्यावरील फटका जोरात बसल्याने निर्मला जागीच गतप्राण झाली.

याप्रकरणी मयत निर्मलाचे वडिल सुरमल मंगळ्या पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली. तर घटनेची माहिती मिळताच धुळे ग्रामीण विभागाचे साक्री येथील डीवायएसपी प्रदीप मैराळे, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंके ,पीएसआय.बी.एम.मालचे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. तसेच काल रात्री साडेआठच्या सुमारास गणेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मालचे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button