राज्य कबड्डी असो.ची वार्षिक सभा पुण्यात | पुढारी

राज्य कबड्डी असो.ची वार्षिक सभा पुण्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा कबड्डी दिन पुरस्कार वितरण व वार्षिक सर्वसाधारण सभा पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील बॉक्सिंग हॉल येथे होणार आहे. असोसिएशनचे सचिव आस्वाद पाटील व आयोजक बाबूराव चांदेरे यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र. 9, बाणेर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (15 जुलै) सायंकाळी 5 वाजता कबड्डी दिन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता मुख्य इमारतीतील कॉन्फरन्स हॉलमध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

Back to top button