नाशिक (विंचुरीदळवी) : पुढारी वृत्तसेवा
परिसरातील शिवडे येथे वीज अंगावर कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.22) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. रवींद्र आनंदा पवार (22) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शिवडे परिसरात बुधवारी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. रवींद्र पवार हा शेळ्या चारण्यासाठी गेला होता. जनता विद्यालयाच्यामागे म्हसोबा मळ्यात शेळ्या चारत असातानाच पाऊस आल्याने तो झाडाच्या आडोशाला गेला. त्यावेळी वीज अंगावर कोसळली. ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमी रवींद्रला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तथापि, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले. सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पांगरीत धुवाधार पाऊस
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागास वादळी वार्यासह आलेल्या पावसाने झोपडले आहे. अनेक ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे. पांगरी येथे धुव्वाधार पावसामुळे नागरीकांचे मोठे हाल झाले. पाऊस सुरु झाल्याने शिक्षकांना शाळा सोडता आल्या नाही. विद्यार्थी व शिक्षक शाळेतच बर्याच वेळापर्यंत अडकले होते.