सेना-भाजपच्या लोकप्रतिनिधींची घडामोडींबद्दल ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट, | पुढारी

सेना-भाजपच्या लोकप्रतिनिधींची घडामोडींबद्दल 'हाताची घडी अन् तोंडावर बोट,

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेच्या मुंबईतील बैठकीस राज्यातील दोन खासदार अनुपस्थित राहिल्याची चर्चा असतानाच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मात्र या बैठकीस हजेरी लावली. शिवसेनेतील बंडाविषयी मात्र खासदार हेमंत गोडसे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ते म्हणाले की, मी मुंबई येथे बोलाविलेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत उपस्थित होतो. आम्हाला सध्या सुरू असणार्‍या घडामोडींविषयी प्रसिद्धिमाध्यमांसोबत प्रतिक्रिया देण्यास किंवा बोलण्यास सक्त ताकीद देत मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे याविषयी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा महिती देऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे भाजपच्या लोकप्रतिनिधी अन् पदाधिकार्‍यांसोबत संपर्क केला असता त्यांनीही राज्यातील ताज्या घडामोडींबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे एरवी प्रसिद्धिमाध्यमांसोबत बोलण्यास पुढे असलेल्या राजकीय मंडळींनी सध्याच्या परिस्थितीत हाताची घडी अन् तोंडावर बोट अशी भूमिका घेतलेली दिसते. मुंबई येथे बोलाविण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदार, खासदार यांच्या बैठकीत उपस्थित होतो. बैठकीत काय घडले, याविषयी मी काहीही एक बोलणार नाही. फक्त कोणताही संभ्रम नको म्हणून बोलतो की, मी बैठकीला हजर होतो. ऐवढेच बोलू शकतो, असेही गोडसे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button