वणी ग्रामपंचायत निवडणूक : ग्रामस्थांच्या हरकतींनंतर पुन्हा आरक्षण सोडत, अनेकांच्या पदरी निराशा | पुढारी

वणी ग्रामपंचायत निवडणूक : ग्रामस्थांच्या हरकतींनंतर पुन्हा आरक्षण सोडत, अनेकांच्या पदरी निराशा

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
ग्रामस्थांच्या हरकतींनंतर वणी ग्रामपंचायत निवडणूक वॉर्डनिहाय पुन्हा आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
वणी ग्रामपंचायत निवडणूक वॉर्डनिहाय आरक्षण सोडत रविवारी (दि. 19) पुन्हा हरकती निकालात काढून चिठ्ठी टाकून आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांची घोर निराशा झाली.

मागच्या वेळी झालेल्या आरक्षणात काहीसा बदल झाला असून, एक-दोन जागांचा फेरफार यंदाच्या आरक्षणात झाला आहे. विस्तार अधिकारी अण्णा गोपाळ तसेच ग्रामविकास अधिकारी व तलाठी केंगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. गोपाळ यांनी ग्रामस्थांना सन 2011 च्या नियमावलीचे वाचन करून आरक्षण कसे असेल, याबाबतीत सांगितले. यावेळी काही ग्रामस्थांनी आक्षेप घेत चुकीचे आरक्षण असल्याचे सांगितले. नियमानुसारच आरक्षण सोडत काढत असल्याचे सांगून सागर शिंदे या लहान मुलाकडून चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार वॉर्ड क्रमांक 1 मध्ये झालेला बदल, 3 मध्ये झालेला बदल वगळता, पूर्वी जाहीर केलेले आरक्षण तसेच आहे. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये दोन अनु. जमाती यात स्त्री-पुरुष प्रत्येकी एक व अनु.जाती पुरुष 1, 2मध्ये अनु. जमाती स्त्री 1, सर्वसाधारण पुरुष 1, वॉर्ड 3मध्ये अनु. जमाती पुरुष 1, सर्वसाधारण स्त्री 1, पुरुष 1, वॉर्ड 4 मध्ये घोर निराशा झाली असून, 1 सर्वसाधारण स्त्री, अनु. जमाती स्त्री 1, पुरुष 1, वॉर्ड 5 मध्ये अनु. जाती स्त्री 1, सर्वसाधारण स्त्री 1, अनु. जमाती पुरुष 1, वॉर्ड 6 मध्ये अनु. जमाती स्त्री-पुरुष एकेक, तर सर्वसाधारण पुरुष 1 असे जाहीर करण्यात आले. अनेकांकडून या आरक्षणाचे समर्थन करण्यात आले. कारण वणी ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की, ठराविक मक्तेदारी असल्याचे भासवून निवडणूक लढविली जात होती.

दिंडोरी प्रांतअधिकारी संदीप आहेर तसेच तहसीलदार पंकज पवार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विस्तार अधिकारी अण्णा गोपाळ, ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव, वणी तलाठी समाधान केंगे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली.

हेही वाचा :

Back to top button