सचिन नवले टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का | पुढारी

सचिन नवले टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार मोक्का

पुणे : पुढारी वृत्तसेवा: वानवडी परिसरात टोळी तयार करून दहशत निर्माण करणार्‍या सचिन नवले टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. टोळीत 8 जणांचा समावेश असून, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 84 वी कारवाई आहे.

सचिन संजय नवले (वय 27, रा. फुरसुंगी), कुमार ऊर्फ गोट्या बलभीम लोहार (वय 26), रोहन ऊर्फ भैया अनिल देडगे (वय 25), आकाश दत्तात्रय कोठावळे (वय 25), राहुल हरी घडाई ऊर्फ कोळी (वय 23), आकाश उमेश कसबे (वय 19), ओमकार ईश्वर सुपेकर (वय 21), मयूर राजू सकपाळ (वय 24), श्याम दत्तात्रय सरक (वय 20) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख सचिन नवले व इतरांवर खुनाचा गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याचा तपास करताना इतरांची माहिती मिळाली व ते संघटित टोळी तयार करून गुन्हे करीत असल्याचे दिसून आले. यामुळे या टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी तयार केल्यानंतर परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत तो प्रस्ताव मान्यतेसाठी अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोक्काची कारवाई करण्यात आली. गुप्ता यांनी चालू वर्षात केलेली ही 21 वी कारवाई आहे.

हेही वाचा

रेल्वेस्थानकावर बंदोबस्तात वाढ; ‘अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनाचे पडसाद

देहुरोड : सोहळ्यानिमित्त संस्थानने पालखी प्रस्थानचा कार्यक्रम केला जाहीर

वाळवा तालुक्यात खरिपाची 8.5 टक्के पेरणी

Back to top button