दिशाने केले चाहत्यांना क्‍लीन बोल्ड | पुढारी

दिशाने केले चाहत्यांना क्‍लीन बोल्ड

नवी दिल्ली ः बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या एकापेक्षा एक बोल्ड छायाचित्रांनी नेहमीच चर्चेत राहते. अशा या दिशाने आता प्रमाणापेक्षाही जास्त बोल्ड छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हे छायाचित्र अवघ्या काही मिनिटांमध्ये प्रचंड वेगाने व्हायरल झाले. अवघ्या दोन तासांत या छायाचित्राला साडेआठ लाखांहून जास्त लाईक्स मिळाले. दिशाच्या या बोल्ड छायाचित्राची चर्चा करावयाची झाल्यास हा एक एकदम टाईट वन पीस ड्रेस आहे.

याशिवाय जाळीदार कट ड्रेसला अधिकच बोल्ड बनवतो. दिशा नेहमीच चित्रपटांबरोबरच आपले लूक्स, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसवरून नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. याशिवाय ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत राहण्याचे हरप्रकारे प्रयत्न करत असते. यामुळेच चाहतेही तिच्या नव्या लूक्सची नेहमीच प्रतीक्षा करत असतात. दिशा सध्या जॉन अब्राहम व अर्जुन कपूरसोबत ‘एक विलेन रिटर्नस’ चित्रपटात काम करत आहे.

Back to top button