मुलीच्या गळ्याला चाकू लावत पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न | पुढारी

मुलीच्या गळ्याला चाकू लावत पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पुणे : कौटुंबिक वादातून पंधरा वर्षांच्या मुलीच्या गळ्याला चाकू लावत पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात विकार शेख (वय 50) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नी शनोवर शेख (वय 40) यांनी तक्रार दिली आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला आहे.

कोरोना काळात विकार याचे काम बंद झाले. सध्या तो काहीही करत नाही. दरम्यान, तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे, तर कौटुंबिक वादातून सतत शिवीगाळ करून त्यांना मारहाण करत होता. शनिवारीदेखील त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्याने रागाच्या भरात पंधरावर्षीय मुलीच्या गळ्याला चाकू लावला,

तिला मारून टाकण्याची धमकी दिली, तर पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडत असताना पीडित पत्नीने आरडाओरडा केल्यामुळे शेजारचे नागरिक गोळा झाले. त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तो काडीपेटी आणण्यासाठी धावल्यानंतर तिने स्वत:ची सुटका करून घेतली.

हेही वाचा

अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

वारकर्‍यांसाठी पुणे शहरात मोफत लसीकरणाची सुविधा

पीडितांना जलद न्यायासाठी प्रयत्न : श्रीमती एस. आर. तिवारी

Back to top button