नाशिक : बस व दुचाकीच्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोलिसाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : बस व दुचाकीच्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोलिसाचा मृत्यू

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

मखमलाबाद राेडवरील क्रांतीनगर येथे एसटी बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील सेवानिवृत्त पाेलिस कर्मचाऱ्याचा आज गुरुवारी (दि. 16) दुपारी मृत्यू झाला. दिलीप विक्रमसिंग वळवी (58, रा. अनुसया नगर, मखमलाबाद शिवार) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

आज दुपारी एकच्या सुमारास दिलीप वळवी हे क्रांतीनगर येथील पीर बाबा दर्ग्याजवळून दुचाकीवरुन प्रवास करत हाेते. त्यावेळी एसटी बस व दुचाकीचा अपघात झाला. त्यात वळवी यांच्या डाेक्याला व ताेंडाला जबर मार लागला. त्यांना सागर तुपे यांनी गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच वळवी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत. वळवी हे तीन महिन्यांपूर्वीच पोलिस खात्यातून निवृत्त झाले होते.

हेही वाचा :

Back to top button