नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा
गुजरात राज्यातून महाराष्ट्रात राजरोसपणे दाखल होणाऱ्या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांविरोधात नाशिक विभागीय परीक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने धडाकेबाज कारवाई करत वाहनासह तब्बल 12 लाख 55 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
काल (दि.१५) जून कुमसाडी ता. कळवण येथील धनोली-कनाशी रोड येथे सकाळी ७ वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाईत एकूण १२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वाहनचालक सागर सातपुते रा. कनाशी यास अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी शाहिद शेठ व रहीस खान, रा. गुजरात, वघई हे दोघे मात्र फरार झाले आहे.
या कारवाईनंतर आता गुजरात राज्यातून अवैधपणे तस्करी होणाऱ्या गुटखा, पानमसाला व मानवी आरोग्यास हानीकारक असलेल्या अमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे उघडकीस झाले आहे. दरम्यान गुजरात राज्यातून कळवण तालुक्यासह वणी, देवळा, सटाणा(नामपूर), ओझर मिग, पेठ आदी तालुक्यात गुटखा व तत्सम पदार्थांची अवैध वाहतूक होत असल्याचे बोलले जाते आहे.
हेही वाचा :