उत्तर महाराष्ट्र
Nashik : तिरडशेत गावचा पाणीप्रश्न मिटणार, पर्यावरणमंत्र्यांनीच घेतली दखल
नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा
१५ दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिका हद्दीलगत त्र्यंबक रोडवर असलेल्या तिरडशेत येथील महिलांचा पाण्यासाठीचा रौद्र अवतार अवघ्या जिल्ह्याने पाहिला. तिरडशेत येथील महिलांनी त्रंबकेश्वर रस्त्यावर हंडा-कळशी घेत रास्ता रोको अांदोलन केले होते.
तिरडशेत येथील महिलांनी केलेल्या या आंदोलनाची दखल खुद्द युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. त्यांनी येथे बोअरवेलचे कामसुरु केले आहे. संजय माशीलकर, अमोल किर्तीकर, शिवसेना तालुका प्रमुख संपतराव चव्हाण, माजी आमदार योगेश घोलप व युवासेनेचे नेते राहुल ताजनपुरे तसेच शिवसेना विभाग प्रमुख युवराज धात्रक, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ नागरे, बबन थेटे यांच्या उपस्थित शिवसेना संघटनेच्या वतीने बोअरवेलचे काम याठिकाणी सुरु झाले आहे.