नव्या रुग्णालयाला महागाईचा चटका, ठेकेदार काम करण्यास असमर्थ | पुढारी

नव्या रुग्णालयाला महागाईचा चटका, ठेकेदार काम करण्यास असमर्थ

नगर : पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या हद्दीतील चाहुराणा बुद्रूक येथील जागेत अद्ययावत नवीन रुग्णालयात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वी निविदा काढण्यात आली होती. परंतु, पात्र निविदाधारक न मिळाले नाही. स्टिल व सिमेंटचे दर वाढल्याने कमी दराने काम करण्यास परवडत नसल्याचे सांगत जादा दराने निविदा भरली होती. चर्चेअंती त्याने दर कमी केल्याने त्यावर उद्या (दि.10) स्थायी समितीत निर्णय होणार आहे.

मनपा स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 10) सकाळी स्थायी समितीची सभा होत आहे. या सभेच्या अजेंड्यावर नवीन रुग्णालयाच्या विषयासह अन्य काही विषय घेण्यात आले आहेत. या सर्व विषयांवर स्थायी समितीमध्ये चर्चा होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत अहमदनगर महापालिकेच्या हद्दीत चाहुराणा बुद्रूक सर्व्हे 46/1 या जागेत गोरगरीब रुग्णांसाठी अद्ययावत सुसज्ज नवीन हॉस्पिटल बांधणे उभारण्याच्या निविदेवर चर्चा होणार आहे.

पिंपरी : वेश्याव्यवसाय प्रकरणी तिघांवर गुन्हा

दरम्यान, चाहुराणा बुद्रूक येथे नगरकरांसाठी नव्याने सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यास पात्र निविदाधारक मिळाले नाही. त्यामुळे मनपाने पुन्हा फेर निविदा केली. त्यासाठी तीन ठेकेदाराने निविदा भरल्या. त्यातील एक ठेेकेदार अपात्र ठरला. उर्वरित दोन ठेकेदाराने जादा दराने निविदा भरली.

त्यातील कमी दराने निविदा ठरलेल्या ठेकेदाराला पुन्हा बोलावून दराबाबत चर्चा केली. उपायुक्तांसमोर झालेल्या चर्चेत संबंधित ठेकेदाराने कमी दराने काम करण्यास परवडत नसल्याचे सांगितले. कारण, स्टिल, सिमेंट, डिझेल, पेट्रेाल याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे कमी दराने काम करण्यास परवडत नसल्याचे सांगितले. .

दरम्यान, मनपा अधिकारी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान संबंधित ठेकेदाराने कमी दराने काम करण्यास समर्थता दशविली आहे. कामाची प्राथमिकता, बाजारातील भाव वाढीतील चढ-उतार ठेकेदाराशी झालेल्या चर्चा झाली. यावर स्थायी समितीत चर्चा होऊन निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे.

महागाईची झळ
अचानक वाढलेल्या स्टिल, सिमेंट, पेट्रोल, डिझेल यांच्या किमती वाढल्याने मनाच्या रस्त्याचे काम, वृक्षलागवड आणि आता रुग्णालय कामांचा झळ पोहोचली आहे. महागाई वाढल्याने पूर्वीच्या दराने काम करण्यास ठेकेदार असमर्थता दर्शवित आहेत.

ठेकेदाराने जास्तीच्या दराने टेंडर भरले होते. मनपाला त्या दराने काम देणे परवडत नव्हते. त्यामुळे संबंधित ठेकेदाराशी चर्चा केली असून, तो कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे.
-सुरेश इथापे, शहर अभियंता मनपा, नगर.

Back to top button