नाशिक : वादळी पावसात शेतकर्‍याच्या घराचे छप्पर उडाले, नुकसान भरपाईसाठी साद | पुढारी

नाशिक : वादळी पावसात शेतकर्‍याच्या घराचे छप्पर उडाले, नुकसान भरपाईसाठी साद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पाथरे येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने एका शेतकर्‍याच्या घराचे छप्पर उडून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले.

बुधवारी (दि. 8) सायंकाळनंतर वातावरणात बदल होऊन अचानक वादळी वारे सुटले. जायगाव, नायगाव, पूर्व भागातील पाथरे परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले. हवेचा वेग अधिक असल्याने शेतकर्‍यांची धांदल उडाली. पाथरे शिवारातील ईशान्येश्वर महादेव मंदिर कमान परिसरात राहणारे अमोल गंगाराम शेंडगे (24) यांच्या शेतातील घराचे छप्पर उडून गेले.

शेणगे यांनी नुकतेच घराचे काम केले होते. भिंतीचा काही भाग कोसळला.सुदैवाने कुणाला इजा झाली नाही. घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर व भांड्यांवर पडल्याने त्यांचे नुकसान झाले. वादळी वार्‍याने पत्रे दूरवर फेकले गेले. यामुळे शेंडगे कुटुंबाला पूर्ण रात्र उघड्यावर काढण्याची वेळ आली. शासनाने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेणगे कुटुंबाने केली आहे.

हेही वाचा :

Back to top button