सातारा : खतांच्या वाढीने शेतकरी हैराण; ऐन हंगामात 20 ते 40 टक्क्यांनी वाढ | पुढारी

सातारा : खतांच्या वाढीने शेतकरी हैराण; ऐन हंगामात 20 ते 40 टक्क्यांनी वाढ

उंडाळे (सातारा) : वैभव पाटील

चालू खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍याला सर्व रासायनिक खताच्या किंमत वाढीला तोंड द्यावे लागणार असून, रासायनिक खते आता 20ते 40 टक्क्यांनी महाग झाली आहेत. खतांच्या दरवाढीने शेतकर्‍यांना आता शेती करणे अशक्य बनत चालले आहे.

अलीकडच्या काळात शेतकरी सेंद्रिय खता ऐवजी रासायनिक खतावर मोठ्या प्रमाणात भर देत असून शेतीतून उत्पन्न काढायचे आणि वाढवायचे असेल तर रासायनिक खताचा मात्र दिला पाहिजे, असे मत शेतकर्‍यांचे बनत चालले आहे; परंतु याच रासायनिक खताचा मात्रा आता दिवसेंदिवस महाग होत चालला आहे. चालू खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत 20 ते 40 टक्के एवढी मोठी दरवाढ झाली असून शेतकर्‍यांना ही दरवाढ आता न परवडणारी झाली आहे.

यापूर्वी शेतकर्‍याला रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जात होती. त्यामुळे सबसिडीच्या मुळे कमी दरात खते उपलब्ध होत होती.त्यामुळे शेतकरी सेंद्रिय खते न वापरता रासायनिक खताचा खतावर भर देऊन शेतीचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करत होता.भाजीपाला, गहू, ज्वारी, भात, बाजरी, ऊस, हळद, केळी यापैकी कोणतीही पिके असली तरी त्यास रासायनिक खताचा मात्र दिला जातो.

सेंद्रिय शेतीच्या नावाखाली शेतकरी अनेक ठिकाणी रासायनिक खते टाकून उत्पादन वाढवत असतो, आता मात्र या शेतकर्‍याला रासायनिक खते न परवडणारी इतकी महाग बनली आहेत. यापूर्वी मिळणारी खते व त्यांचे दर पाहता प्रत्येक खताच्या दरात किमान 20 टक्के ते 40 टक्के वाढ झाली आहे. तरीही केंद्र सरकारने काही खतावरील सबसिडी मध्ये वाढ करून ती खते पुन्हा कमी दराने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही त्या खतांमध्ये किमान 30 ते 40 टक्के वाढ ही झालेली दिसून आली आहे. याचाच अर्थ सरकार भविष्यकाळात रासायनिक खतांवरील सबसिडी हळू कमी करून ही खते महाग करणार असल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.

या खतांव्यतिरिक्त द्रवरूप खतांमध्ये 20 ते 25 टक्के वाढ झाली आहे याशिवाय औषधे तृण नाशके यामध्येही मोठी वाढ झाली ही वाढ सुमारे पन्नास टक्के पेक्षा अधिक आहे. सुपर फॉस्फेटचा दर 350 रुपये वरून 500 रुपये पर्यंत पोहोचला आहे ही वाढ मोठी आहे. आधीच अनेक संकटांनी त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना खत वाढीमुळे शेती करणे करणे अवघड झाले आहे.

खताचे नवे व जुने दर पुढीलप्रमाणे

      जुना दर              नवीन दर
10: 26 :26        1470                 1640
20 : 20: 13       1250                  1470
डी.ए.पी.             1200                 1350
युरिया              266.50                266.50
पोटॅश              1040                   1700
12:32:16          1470                  1700
15:15:15          1180                   1500
हे दर त्या त्या विभागातील वाहतुकीवर अवलंबून आहेत.

Back to top button