कुत्र्यासारखे तोंड असलेल्या डायनासोरचे जीवाश्म | पुढारी

कुत्र्यासारखे तोंड असलेल्या डायनासोरचे जीवाश्म

कैरो : इजिप्तमध्ये वैज्ञानिकांनी कुत्र्यासारखे तोंड असलेल्या विचित्र डायनासोरचे जीवाश्म शोधले आहे. या डायनासोरचा आकार एखाद्या स्कूलबसइतका होता. मात्र, त्याचे हात अतिशय छोट्या आकाराचे होते. सुमारे 9 कोटी 80 लाख वर्षांपूर्वी हा डायनासोर सहारा वाळवंटाच्या परिसरात वावरत होता.

या डायनासोरची हाडे संशोधकांना इजिप्तच्या पश्चिम वाळवंटात बहारिया ओअ‍ॅसिस परिसरात सापडली आहेत. त्यांनी अद्याप या अनोख्या डायनासोरला नाव दिलेले नाही. हा प्राचीन जीव आपल्या मागील दोन पायांनी चालत असे. त्याचे दात छोटे आणि हात मजबूत होते. हा जमिनीवर राहणारा मांसाहारी डायनासोर होता. त्याची लांबी वीस फूट होती. ‘अ‍ॅबेलीसॉरीड’ या सरड्यांसारख्या दिसणार्‍या जीवांच्या कुळाशी संबंधित ही प्रजाती आहे. हे डायनासोर क्रेटेशस काळात म्हणजेच 14 कोटी 50 लाख ते 6.6 कोटी वर्षांपूर्वीच्या काळात अस्तित्वात होते. हा डायनासोरचा पृथ्वीवरील अंतिम काळ होता. यापूर्वी अ‍ॅबेलीसॉरीड प्रजातीच्या डायनासोरचे जीवाश्म सध्याच्या युरोप आणि दक्षिण गोलार्धातील काही भागातही आढळले आहेत. आता बहारियामध्येही ते सापडणे हे आश्चर्यजनक आहे.

Back to top button