स्टाइस’च्या निवडणुकीचा बिगुल वाजला, 17 जुलै रोजी मतदान

स्टाइस’च्या निवडणुकीचा बिगुल वाजला, 17 जुलै रोजी मतदान

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या (स्टाइस) संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्थेचे उपनिबंधक अधिन सहनिबंधक किरण गायकवाड काम पाहणार आहेत.

नामनिर्देशन पत्रे निवडणूक कार्यालयात 9 जून ते 15 जून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्रांच्या यादीचे प्रकाशन हे जस जसे प्राप्त होतील त्याप्रमाणे रोज संध्याकाळी 4 वाजता होईल. 16 जून रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक कार्यालयात नामनिर्देशन पत्राची छाननी होईल.

वैध नामनिर्देशन पत्राची सूची 17 जूनला निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येईल. 17 जून ते 1 जुलै सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. 4 जुलै रोजी उमेदवारांना निशाणीचे वाटप व अंतिम यादीचे प्रकाशन होणार आहे.

17 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाचे स्थळ निवडणूक निर्णय अधिकारी घोषीत करतील. मतमोजणी 17 जुलै रोजी मतदान संपल्यानंतर अर्धा तासाने होईल. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच निकाल घोषीत करण्यात येणार आहे.

दरम्यान, गत पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे यंदाही आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news