‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया’ला नोटीस; आवारातील हॉटेल अनधिकृत | पुढारी

‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया’ला नोटीस; आवारातील हॉटेल अनधिकृत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सर्व्हंट्स आफॅ इंडिया सोसायटी पदाधिकार्‍यांच्या वार्षिक बैठकीत गोंधळ झाल्याने ती एक तासासाठी स्थगित करण्यात आली, तर दुसरीकडे दै. ‘पुढारी’च्या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या झोन क्रंमाक 6 च्या अभियंत्यांनी सोसायटीला हॉटेलचे बेकायदा बांधकाम का पाडण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली.

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात, भाजपकडून पाठिंबा

याबाबत पंधरा दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश पालिकेने जारी केले आहेत. ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीमधील वाद चव्हाट्यावर’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने बुधवारी वृत्त प्रकाशित करताच शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. सोसायटीत उपाध्यक्षपदावर असलेल्या आत्मानंद मिश्रा यांनी अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांवर आरोप लावत उपोषणाचा इशारा दिला होता. डेक्कन पोलिसांनी उपाध्यक्ष मिश्रा यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली.

मुंबई : मानखुर्दमध्ये पुन्हा अग्नीतांडव; गोदामांना भीषण आग

विरोध करणारे मिश्रा हे बुधवारी होणार्‍या वार्षिक बैठकीत सहभागी झाल्याने त्यांचा वाद संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. बैठकीतील सहभागाबद्दल मिश्रा म्हणाले, ‘मी उपोषणास बसलो नसलो तरी माझा विरोध कायम आहे. संस्थेचे अध्यक्ष बहुमताचा विचार न करता एकाधिकारशाही वापरून निर्णय घेतात. त्या कृत्याला विरोध कायम आहे.’
नोटीस प्रकरणी हॉटेलचालक संदीप शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीदेखील नोटीस मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला, तर महापालिका झोन क्रमांक 6 चे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांनी स्पष्ट केले की, उपअभियंत्याच्या स्वाक्षरीने नोटीस बजाविण्यात आलेली आहे. संस्थेला पंधरा दिवसांत त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी वेळ देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात होणार आशियातील पहिले कायदा विद्यापीठ

दुसरीकडे, संस्था सचिव मिलिंद देशमुख यांनी कोणतेच भाष्य केले नाही. सोसायटीच्या बैठकीत सुरुवातीला गोंधळ झाल्याने एक तासासाठी बैठक स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट करून संस्थेवर आरोप करणार्‍या उपाध्यक्ष मिश्रा यांच्याशी बोलणे करून देत ‘ऑल इज वेल’ असल्याचे सांगितले.

कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी थेट केंद्रीय मंत्र्याचा महापालिका अधिकाऱ्याला फोन

हॉटेल अमेयला नोटीस…

सोसायटीमधील वादाच्या वृत्ताची दखल घेत महापालिकेने संस्थेच्या आवारात बांधण्यात आलेल्या हॉटेल अमेयला नोटीस बजावली आहे. पालिकेने या नोटिशीत म्हटले आहे की, सर्व्हंट्स आफॅ इंडिया सोसायटीच्या आवारात विनापरवाना पत्र्याची शेड व किचनचे बांधकाम करून हॉटेलचा व्यवसाय सुरू करण्यात आला. हे बांधकाम विनापरवानगी बांधलेले असून, ते का पाडण्यात येऊ नये ?

Back to top button