नाशिक : केसपेपर काढण्यास सांगितल्याच्या रागातून जखमी तरुणाचा डॉक्टरांवरच हल्ला | पुढारी

नाशिक : केसपेपर काढण्यास सांगितल्याच्या रागातून जखमी तरुणाचा डॉक्टरांवरच हल्ला

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या युवकाने केवळ केसपेपर काढण्यास सांगितल्याच्या कारणावरून थेट डॉक्टरांवर धारदार कटरने हल्ला केला.

मालेगाव सामान्य रुग्णालयात रविवारी (दि.5) रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी अवस्थेत दोन युवक सामान्य रुग्णालयात गेले. अधिक जखमी रुग्णावर उपचाराला प्राधान्य देत दुसरा जखमी अश्पाक शहा मुश्ताक शहा (25, रा. संजेरी चौक, रमजानपुरा) याला केस पेपर काढण्यास डॉ. अभय पोतदार यांनी सांगितले.

आपल्यावर तत्काळ उपचार करावेत, असा हट्ट धरत शहा याने शिवीगाळ-धक्काबुक्की करीत धारदार कटरने डॉ. पोतदार यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तो त्यांनी चुकविल्याने बचावले. वार्डातील सलाइन बॉटल आदी साहित्याची फेकाफेक करीत शहा याने डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सावंजी या तपास करीत आहेत. दरम्यान, घटनेनंतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आंदोलनही केले.

हेही वाचा :

Back to top button