नाशिक : मराठा महासंघाची शाखा विस्तारावर बैठकीत चर्चा | पुढारी

नाशिक : मराठा महासंघाची शाखा विस्तारावर बैठकीत चर्चा

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मालेगाव तालुका व शहर विभागाची बैठक जिल्हाध्यक्ष निंबा निकम यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडली. एम. के. बोरसे यांनी प्रास्ताविक केले. गाव तेथे शाखा, सभासद नोंदणी आदी विषयांवर यावेळी चर्चा व मार्गदर्शन झाले. प्रारंभी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी शहराध्यक्ष सुभाष गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष हरिदादा निकम, तालुकाध्यक्ष भरत पाटील, युवा जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप पाटील, अशोक जाधव, दिनेश पाटील, देवा पाटील, निखील पवार, जितेंद्र देसले, जगन्नाथ बोरसे, गाजी अमानुल्ला खान यांनी मनोगत व्यक्त केले. नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. बैठकीस पवन महाले, बापू पाटील, सुरेश शेलार, अशोक जाधव, कैलास दरेकर, दीपक बच्छाव, हरीश पाटील, चंदू जाधव, आबा पवार, राकेश कट्ट्यारे, दीपक पाटील, नीलेश पाटील, दीपक पवार, चंदू देवरे, नितेश भुसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button