हॅप्पी हार्मोन्स : दिवसभर फ्रेश राहयचंय;मग सकाळी ‘ही’ पाच कामे कराच

हॅप्पी हार्मोन्स : दिवसभर फ्रेश राहयचंय;मग सकाळी ‘ही’ पाच कामे कराच
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

आपल्‍या शरीरात हार्मोन्स निर्मिती वेगवेगळ्या भागातील ग्रंथी करत असतात. शरीरातील काही हार्मोन्स असे आहेत की, ज्यांच्यामुळे आपण खूश आणि आनंदी राहतो.  त्याला वैद्‍यकीय भाषेत 'हॅप्पी हार्मोन्स' असेही म्हणतात.  असं म्हणतात की, दिवसाची सुरुवात चांगली झाली की आपला दिवस चांगला जातो. या संंबधित प्रत्येकाची मते, अनुभव आणि आनंद मिळवण्याच्या सवयी वेगवेगळ्या असू शकतात.  काहींना सकाळी सकाळी खाल्यानंतर दिवस चांगला जातो. तर काहींना सकाळी व्यायाम किंवा गाणी म्हंटल्यानंतर दिवस चांगला जातो. पण मानसशास्त्रज्ञांच्या मते,  आपल्याला वाटणारा आनंद आणि दु:ख या गोष्टी आपल्या शरीरातील हार्मोन्सवर अवलंबून असतात.काहीवेळा लोकांना अचानक उदासिन वाटते, मन कशात लागत नाही, करमत नाही हा सर्व प्रकार आपल्या शरीरातील हार्मोन्समूळे होतो.

Healthहॅप्पी हार्मोन्स

आज आपण अशा हार्मोन्सबद्दल बोलणार आहोत जे माणसाला आतून आनंदी ठेवण्यास मदत करते. या हार्मोन्सला एंडोर्फिन किंवा  हॅप्पी हार्मोन्स असेही म्हणतात. याची निर्मिती प्रामुख्याने ही पिट्युटरी ग्रंथीत होत असते. हे हार्मोन्स आपल्या शरीरात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. जेव्हाआपल्याला अस्वस्थ वाटायला लागते, करमत नाही तेव्हा काही लोक व्यायाम करतात, गाणी म्हणतात, डान्स करतात तर काहीजण आपल्या आवडीचा पदार्थ खातात यामूळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन्सची निर्मिती होत असते. म्हणून या  हार्मोन्सला  दु:ख निवारक, असेही म्हणतात. या हार्मोन्सची वाढ करण्यासाठी विवीध प्रकार पाहायला मिळतात.  चला तर मग पाहूया  हॅप्पी हार्मोन्स वाढण्यासाठी काय करायला  हवे.

Health

हॅप्पी हार्मोन्स वाढवण्यासाठी हे करा

आपलं हॅप्पी हार्माेन्स वाढवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करता येवू शकतात. त्यापैकी पुढीलप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि वेळेनूसार करु शकता. उदा. वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, डान्स.

डान्स – डान्स करत एक्सरसाइज करु शकता आणि तुमच्या भावनाही व्यक्त करु शकता. ज्यावेळी तुम्ही इतर सहकाऱ्यांबरोबर डान्स करता तेव्हा त्यांच्याबरोबरचे तुमचे संबध चांगले बनू शकतात. २०१६ मध्ये झालेल्या एका अभ्यासानूसार, सौहार्यदार्यपूर्ण अशा  सामाजिक भावनेमूळेही तुमच्या शरीरातील  एंडोर्फिन हार्मोन्स वाढू शकते.

हसणे – तुमचं खळखळून हसणं हे कितीतरी समस्यांवर औषध म्हणून काम करते. २०१७ मध्ये झालेल्या एका अभ्यासानूसार सामूहिक हास्य हे एंडोर्फिन हार्मोन्स वाढण्यास मदत करते. २०११ मध्ये झालेल्या एका अभ्यासानूसार असे स्पष्ट झाले की, हसणं तुमची सहन करण्याची क्षमता वाढवू शकते.

आवडीचं खाणे – जर का तुम्ही तुमच्या आवडीचं काही खात असाल तर, एंडोर्फिन हार्मोन नक्की वाढणार. जर का तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रत्येक सकाळ जर चांगली जावी तर तुम्ही दररोज सकाळी तुमच्या आवडीचे पदार्थ खायचे.

डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेट खाल्ल्यामूळे एंडोर्फिन हार्मोन वाढण्यास मदत होते. पण, ते जादा खाल्याने त्रासही होवू शकतो. त्यामूळे गरजेनूसार डार्क चॉकलेट खाणेच योग्य.

गळाभेट – गळाभेट घेतल्यानंतर आपल्या शरीरात आणि मानसिकतेवर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही कोणाची गळाभेट घेता तेव्हा तुमच्या शरिरात ऑक्सीटोसिन हे हॅप्पी हार्मोन्स तयार होते. ऑक्सीटोसिन हे हार्मोन एंडोर्फिन सारखचं काम करते,  जे तुम्हाला आनंदी ठेवते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news