मविआचे सरकार हे वसुली सरकार, त्यांनी लावलेल्या सर्व चौकशा संशयास्पद : दरेकर | पुढारी

मविआचे सरकार हे वसुली सरकार, त्यांनी लावलेल्या सर्व चौकशा संशयास्पद : दरेकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेतील म्हाडा प्रकरणी शासनाने केवळ आयुक्तांच्या बदलीचे सोपस्कार पाडले. मविआचे सरकार हे वसुली सरकार असून, त्यांनी लावलेल्या सर्वच चौकशा संशयाच्या भोवर्‍यात आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. मनपातील 800 कोटींच्या घोटाळ्यावर बोलताना, भाजप कोणालाही पाठीशी घालत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महसूल विभागात बदल्यांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असून, त्याचा पर्दाफाश करणार असल्याचा गौप्यस्फोेटही दरेकरांनी केला.

ना. प्रवीण दरेकर म्हणाले, म्हाडाचे प्रकरण भयंकर असून, विधिमंडळात आवाज उठवल्यावर सरकारने तत्कालीन मनपा आयुक्तांची बदली करत चौकशीचे आश्वासन दिले होते. पण त्यात पुढे काहीच झाले नाही. राज्य सरकारची भूमिका म्हणजे एकाने बदली करायची अन् दुसर्‍याने ती थांबवायची. परंतु, या प्रकरणाची तड लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही ना. दरेकर यांनी सांगितले.

महापालिकेत भाजपची सत्ता असताना, 800 कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी ना. दरेकर यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर, घोटाळे करणार्‍यांना भाजप कधीही पाठीशी घालत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. घोटाळ्यावरून भाजपवर टीका करणार्‍या मविआमधील तिन्ही पक्षांचा समाचार घेताना, राज्यात तुमचे सरकार असून, या घोटाळ्याची खुशाल चौकशी करावी, असा ना. दरेकर म्हणाले.

राज्यातील सरकार वसुली सरकार असून, त्यांचे अधिकारीदेखील वसुलीत मश्गूल असल्याचा आरोप ना. दरेकर यांनी केला. पोलिस दलातील बदल्यांवरून मंत्री, अधिकारी तुरुंगात गेले आहेत. पोलिस दलाप्रमाणे महसूलमध्येही प्रांत व तहसीलदारांच्या बदल्यांमधून मोठा भ—ष्टाचार होत आहे. भिवंडीसारख्या ठिकाणी प्रांताला 4 ते 5 कोटी रुपये मोजावे लागत असून, शहराजवळील पदांसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. त्यामुळे पैसे देऊन पदावर आलेल्या अधिकार्‍यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा कशी ठेवता येईल, असा मुद्दा त्यांनी उपस्थित करतानाच, विधिमंडळात बदल्यांचा भ—ष्टाचार उघडकीस आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button