मुस्लीम कब्रस्तानात पाण्याची टाकी | पुढारी

मुस्लीम कब्रस्तानात पाण्याची टाकी

निघोज : पुढारी वृत्तसेवा

पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून निघोज गणात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली असून, विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांनी दिली.  निघोज येथील मुस्लिम कब्रस्तानात पाण्याची टाकी देण्यात आली. या वेळी नजीरभाई मोमीन यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

गडकरींमुळे ‘रिंगरोड’चे दोन हजार कोटी वाचणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

यावेळी बाबर बोलत होते. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी अकबर मोमिन, याकूब तांबोळी, बशीर तांबोळी, मुस्ताफा सय्यद, रफिक सय्यद, हनीफ इनामदार , शामिर इनामदार, मुन्ना वाकळे ,राजू वाकळे, रफिक हवालदार, गणीभाई हवालदार, अल्लाउद्दिन शेख, रहिम खान पठाण, सलीम पठाण, साजिद तांबोळी, मुजम्मिल सय्यद, अल्फेज इनामदार, सुलतान सय्यद, इम्रान सय्यद आदी उपस्थित होते.

मनसुख खूनप्रकरणी चौकशी केल्यास ठाकरे अडचणीत येतील : सोमय्या

बाबर म्हणाले, पंचायत समिती माध्यमातून निघोज गणात स्मशानभूमी, कब्रस्तान, तसेच दशक्रिया विधी घाटासाठी 20 लाख रुपये निधी दिला. पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

 

Back to top button