नाशिक : नामपूरच्या भूमिपुत्राचा ‘यूपीएससी’त डंका | पुढारी

नाशिक : नामपूरच्या भूमिपुत्राचा ‘यूपीएससी’त डंका

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
नामपूरचा भूमिपुत्र अक्षय वाखारे याने यूपीएससी परीक्षेत डंका वाजवला असून, त्याच्या यशाने नामपूरच्या वाखारे व कट्यारे परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

नामपूरचे भूमिपुत्र आणि सध्या नाशिक येथील नोटप्रेसमध्ये नोकरीस असलेल्या अनिल रघुनाथ वाखारे यांचे चिरंजीव अक्षय यांनी नुकत्याच झालेल्या यूपीएससी परीक्षेत 203 रँक प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. खास बाब म्हणजे नामपूरच मामाचे गाव असणार्‍या अक्षयच्या या यशाने साहजिकच नामपूर येथील वाखारे व कट्यारे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अर्थातच दुसरीकडे नामपूरसह बागलाणवासीयांनादेखील अक्षयच्या यशाने अभिमानास्पद अनुभव आला आहे. त्यामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबीयांचे तालुकाभरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. आई मंदाकिनी ही गृहिणी असून, अक्षयचे मामा दीपक कृष्णा कट्यारे हे नामपूरला वास्तव्याला आहेत. यानिमित्ताने मंगळवारी (दि.31) नाशिक येथे जाऊन अक्षयचे मामा गणेश खरोटे, दीपक कट्यारे, महेंद्र सावंत, प्रकाश कट्यारे, अजय कट्यारे, सुनील निकुंभ आदींनी अक्षयचे अभिनंदन केले.

हेही वाचा:

Back to top button