नाशिक : बोलणे व भेटणे बंद केल्याने प्रियकराचा प्रेयसीवर हल्ला, भरचौकात मारहाण | पुढारी

नाशिक : बोलणे व भेटणे बंद केल्याने प्रियकराचा प्रेयसीवर हल्ला, भरचौकात मारहाण

नाशिकरोड : प्रेयसीने अचानक बोलणे व भेटणे बंद केल्याचा राग आल्यामुळे संतप्त प्रियकराने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार देवी चौक, नाशिकरोड परिसरात घडला. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीनंतर नाशिकरोड पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

पीडित तरुणी ही जेलरोड परिसरात राहणारी असून, संशयित प्रियकरही याच परिसरात राहतो. शुभम अरुण घोलप असे संशयिताचे नाव असून, पीडित मुलगी देवी चौकातील एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करते. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी ही शुभमबरोबर बोलत नव्हती. तसेच त्याला भेटतही नव्हती. त्यामुळे शुभमचा राग अनावर झाला व त्याने पीडितेला देवी चौकात गाठून मारहाण केली.

हेही वाचा :

Back to top button