नाशिक : शहा शिवारात अवैध वाळू वाहतूक; 14 लाखांच्या डंपरसह 44 हजारांची वाळू जप्त | पुढारी

नाशिक : शहा शिवारात अवैध वाळू वाहतूक; 14 लाखांच्या डंपरसह 44 हजारांची वाळू जप्त

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या पूर्व भागातील शहा शिवारात कोपरगाव तालुक्यातून सिन्नर तालुक्याकडे अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडून चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील गोदावरी नदीपात्रातून 30 टन वाळू भरून हा डंपर येत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहा शिवारात जय मल्हार हॉटेलसमोर कोळपेवाडी-पंचाळे रस्त्यावर पकडला. त्यात सुमारे 44 हजार 834 रुपयांची 30 टन वाळू होती. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवान्यामध्ये खाडाखोड व फेरफार करण्यात आला. परवाना अधिकृत व खरा आहे, असे भासवून शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अवैध गौण खनिज वाळू चोरून घेऊन जात असल्याप्रकरणी चालक व मालक यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल ढुमरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 14 लाखांचा डंपर व सुमारे 44 हजारांची वाळू जप्त केली आहे. वावी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी. आर. गवळी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button