पुणे :वाहन उत्पादकांसाठीच रिक्षा परवाने खुले; रिक्षा संघटनांचा आरोप | पुढारी

पुणे :वाहन उत्पादकांसाठीच रिक्षा परवाने खुले; रिक्षा संघटनांचा आरोप

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘सध्या रिक्षांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी, स्पर्धात्मक स्थिती निर्माण होत आहे. रिक्षांचे परवाने केवळ वाहन उत्पादकांच्या अर्थपूर्णत्वासाठी खुले ठेवण्यात आले आहेत,’ असा आरोप रिक्षा संघटनांकडून करण्यात आला आहे. खुला रिक्षा परवाना बंद करण्याच्या प्रस्तावाबाबत दै. ‘पुढारी’ने शुक्रवारी (दि. 27) वृत्त प्रसिध्द केले होते.

याबाबत रिक्षा संघटनांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ‘शिक्षण कमी झाले, रोजगार मिळाला नाही, म्हणून आजकाल कोणीही उठतो आणि रिक्षा परमिट काढतो. त्यामुळे शहरात रिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, नव्या रिक्षांचे हप्ते भरणे, रिक्षाच्या इन्शुरन्साठी, मेंटनन्ससाठी, घरसंसार चालविण्यासाठी दिवसरात्र मेहनत करूनसुध्दा पूरक असे पैसे मिळत नाहीत.

शासनाने एका भाकरीचे चार तुकडे करून, कष्टकर्‍यांमध्ये भांडणे लावली आहेत. त्यामुळे खुला रिक्षा परवाना देणे तत्काळ बंद करायला हवे,’ असे या संघटनांचे म्हणणे आहे.

आ. लंके यांची जागा पवारांच्या मनात : मेहबूब शेख

रिक्षांची संख्या शहरात सध्या खूपच वाढली आहे. त्यामुळे खुला परवाना आता बंद करण्याची गरज आहे. रिक्षा परवाना बंद करण्यासाठी मी आरटीए सदस्य असताना अनेकदा प्रयत्न केले आहेत. ठराव दिले आहेत. मात्र, लोकसंख्या आणि रिक्षासंख्या यांचा विचार करून प्रशासनाने अगोदरच स्वत:हून रिक्षा परवाने बंद करायला हवे होते. मात्र, प्रशासनाकडून चालढकल सुरू असल्याचे दिसते.

– बाबा शिंदे, माजी आरटीए सदस्य, अध्यक्ष, चालक-मालक प्रतिनिधी संघ

हेही वाचा

सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडेंच्या बंगल्यातून १३ लाखांचे दागिने चोरीला

समीर वानखेडे केंद्रीय यंत्रणेचे पोपट : नाना पटोले

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीत झालायं असा बदल

Back to top button