पुणेकरांनो ! खाद्यतेलाच्या किमती कमी होणार पण……………….. | पुढारी

पुणेकरांनो ! खाद्यतेलाच्या किमती कमी होणार पण....................

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सोयाबीन व सूर्यफूल तेलावरील साडेपाच टक्के आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी खाद्यतेलांच्या स्वस्ताईसाठी पुणेकरांना एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे. खाद्यतेल आयातीची शासकीय प्रक्रिया, तसेच विदेशातील बाजारपेठांमध्ये खाद्यतेलांची स्थिती यानुसार आगामी काळात खाद्यतेलांचे दर ठरणार आहेत.

खाद्यतेलाचे व्यापारी कन्हैयालाल गुजराथी म्हणाले, ‘सूर्यफूल व सोयाबीन तेलाची आयात करण्यासाठी व्यापारी वर्गाला एक अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी 17 जून ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर शासनाकडून खाद्यतेल व्यापार्‍याला आयातीचा परवाना जारी करण्यात येणार आहे. यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार आहे.

राणा दाम्‍पत्‍य ३६ दिवसांनी अमरावतीला परतणार, मारूती मंदिरात राणा-राष्‍ट्रवादी समर्थक पुन्हा आमने-सामने ?

यापूर्वीही आयात शुल्क, तसेच कृषी करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ज्यावेळी केंद्र सरकारकडून शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात येतो त्यानंतर विदेशातील स्थानिक बाजारपेठांमध्ये खाद्यतेलांच्या दरात वाढ होते. त्यामुळे देशात तेलाचे दर कमी होण्याऐवजी ते स्थिर राहत असल्याचे दिसून येते.

आयात शुल्क पूर्णपणे माफ करत आयातीची मर्यादा घालून व्यापारी वर्गाला तेल आयातीचा परवाना देण्याचे जाहीर केले आहे. एरवी आयात शुल्क सरसकट कमी झाल्यानंतर खरेदीदारांकडून तेलाला मागणी वाढत होती. परदेशांतील बाजारपेठांमध्ये तेलाला मागणी वाढून दर वाढल्यामुळे देशातील खाद्यतेलांचे दर कमी होण्याच्या दृष्टीने विशेष फरक जाणवत नव्हता.

IPL 2022 Final : राजस्थानपेक्षा गुजरातचे पारडे भारी; आयपीएलला मिळणार नवा चॅम्पियन ?

यावेळी मात्र माल मागविण्यावर मर्यादेचे बंधन आणल्याने, तसेच ठराविक मागणीवरच सूट दिली जाणार असल्याने खरेदीदारांकडून प्रमाणापेक्षा जास्त मालाच्या खरेदीवर बंधने येतील. त्यामुळे एरवी आयात शुल्क कमी केल्यानंतर परदेशातील बाजारपेठांमध्ये खाद्यतेलांच्या अवाढव्य मागणीत वाढ होऊन होणारी दरवाढ यावेळी होणार नसल्याचे स्पष्ट होते.  खाद्यतेलांचे दर कितीने कमी होतील, हे सध्या सांगता येत नसले, असे खाद्यतेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले.

रोज तीनशे टन खाद्यतेलाची विक्री
पुणे शहरात रोज जवळपास तीनशे टन खाद्यतेलाची विक्री होते. यामध्ये सोयाबीन तेल व सूर्यफूल तेलाला सर्वाधिक मागणी राहते. यामध्ये रशिया व युक्रेनहून सूर्यफूल, तर अमेरिका व अर्जेंटिनाहून सोयाबीन तेलाचा पुरवठा ा होतो. जगभरात तेलबियांचे घटलेले उत्पादन व रशिया-युक्रेन युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम देशात होणार्‍या तेलाच्या आयातीवर झाला आहे. मागणी जास्त व आवक कमी असल्याने खाद्यतेलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

निक जोनास लाडक्या लेकीसाठी गातोय अंगाई

 

Back to top button