धक्कादायक ! पुणे जिल्ह्यात 27 शाळा अनधिकृत; तुमची मुलं तर नाहीत ना या शाळांमध्ये, जाणून घ्या एका क्लीकवर

धक्कादायक ! पुणे जिल्ह्यात 27 शाळा अनधिकृत; तुमची मुलं तर नाहीत ना या शाळांमध्ये, जाणून घ्या एका क्लीकवर

पुणे: पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या जिल्ह्यात 27 शाळा सुरू असल्याचे समोर आले. त्या शाळांची मान्यता काढण्यात आली आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी घाबरून जाऊ नये. या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश देण्याची व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यात अनेकांनी परवानगी न घेता शाळा सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या शाळांत शिकणार्‍या मुलांचे भवितव्य अडचणीत आले असून पालक घाबरले आहेत. मोफत शिक्षण कायद्यानुसार कोणतीही शाळा सरकार अथवा स्थानिक प्राधिकरणाची मान्यता किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सुरू करता येत नाही. मान्यता न घेता शाळा सुरू केल्याचे आढळल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येते. तसेच एक लाखापर्यंतचा दंडही करण्यात येतो, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

आयुष प्रसाद म्हणाले, 'पुणे जिल्ह्यात शिक्षण विभागाची परवानगी न घेता 27 शाळा गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होत्या. त्या शिक्षण संस्थांबाबत काही माहिती अधिकार्‍यांमार्फत प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे गटविकास अधिकार्‍यांनी शाळांमध्ये जाऊन पाहणी केली. त्या पाहणीनंतर 27 शाळा अनधिकृत असल्याचे आढळले आहे. त्या शाळांवर आम्ही कारवाई केली आहे. तसेच शाळांची मान्यता काढून घेतली आहे. यात हवेली, पुरंदर, इंदापूर, खेड, मावळ, मुळशी, शिरूर या तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे. सर्वाधिक अनधिकृत शाळा हवेली तालुक्यात आहेत.

या आहेत अनधिकृत शाळा

  1. सुलोचनाताई झेंडे बालविकास मंदिर व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी
  2. बी. बी. एस. इंटरनॅशनल स्कूल, वाघोली
  3. रिव्हर स्टोन इंग्लिश मीडियम स्कूल, पेरणे फाटा
  4. व्ही. टी. एल. ई-लर्निंग स्कूल, भेकराईनगर
  5. किड्स वर्ल्ड इंग्लिश मीडियम स्कूल, पापडेवस्ती, फुरसुंगी
  6. संस्कृती पब्लिक स्कूल (माध्यमिक), उत्तमनगर
  7. न्यूटन इंग्लिश मीडियम स्कूल, मांगडेवाडी
  8. शिवसमर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, मांगडेवाडी
  9. ऑर्चिड इंटरनॅशनल, आंबेगाव बु.
  10. संस्कृती नॅशनल स्कूल, लिपाणेवस्ती, जांभूळवाडी
  11. संत सावतामाळी प्राथमिक विद्यालय, लोणी काळभोर
  12. पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, लोणी काळभोर
  13. द. टायग्रेश स्कूल, कदमवाकवस्ती
  14. ई-मॅन्युअल इंग्लिश स्कूल, खांदवेनगर
  15. लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल
  16. काळेवस्ती, महात्मा फुले विद्यालय निमगाव केतकी
  17. गौतमेश्वर प्राथमिक विद्यालय, दत्तनगर
  18. शंभू महादेव विद्यालय, दगडवाडी
  19. ईरा पब्लिक स्कूल, इंदापूर
  20. विठ्ठलराव शिंदे विद्यालय, इंदापूर
  21. जयहिंद पब्लिक स्कूल, भोसे, ता. खेड
  22. सह्याद्री माध्यमिक विद्यालय, मटेलवाडी, ता. मावळ
  23. डिवाईन विस्डम प्रायमरी स्कूल, वाकसाई, ता. मावळ
  24. सरस्वती प्री-प्रायमरी विद्यामंदिर, पिरंगुट
  25. नवीन प्राथमिक शाळा, जेजुरी
  26. शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, राख, ता. पुरंदर
  27. आकांशा स्पेशल चाईल्ड स्कूल, शिरूर ग्रामीण

https://youtu.be/m5yyfqkYqY4

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news