नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार | पुढारी

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

नाशिक (लोहोणेर) : देवळा तालुक्यातील सावकी येथील शेतकरी साहेबराव दौलत बोरसे यांच्या वासरावर काल बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला करून वासराचा फडशा पाडला. यामुळे सावकी परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सावकी येथील शेतकरी साहेबराव बोरसे यांची सावकी – ठेंगोडा रस्त्यावर (गट नंबर 339) मध्ये शेती आहे. पहाटे चारच्या दरम्यान गोठ्यात बांधलेल्या सुमारे अडीच वर्षाच्या वासरीवर बिबट्याने हल्ला करीत ठार केले. याबाबत वन विभागाने पंचनामा केला आहे. परिसरात बिबट्याचे वेळोवेळी दर्शन घडल्याचे शेतकरी सांगतात. नागरिक व पशुधन सुरक्षित राहावे, यासाठी बिबट्याचा बंदोबस्त करावा, वनविभागाने या परिसरात त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व पशुपालकांच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष धनंजय बोरसे यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button