Nashik : पंचवटीत अस्वच्छता करणाऱ्यांकडून ‘इतक्या’ हजारांचा दंड वसूल | पुढारी

Nashik : पंचवटीत अस्वच्छता करणाऱ्यांकडून 'इतक्या' हजारांचा दंड वसूल

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदीपात्र आणि पंचवटी परिसरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून मनपा पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाने शनिवारी (दि.२७) केलेल्या कारवाईत २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. (Nashik)

नाशिक (Nashik) मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशाने व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राबडिया यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वछता निरीक्षक संजय दराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या १२ जणांवर कारवाई करून ३ हजार ५०० रुपये दंड, प्रतिबंधित प्लास्टिक कॅरिबॅग व ग्लासचा वापर करताना आढळलेल्या ०३ जणांकडून १५ हजार रुपये दंड आणि तब्बल ५३ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

तिसरी कारवाई गोदावरी नदी पात्रातील अस्वच्छता केल्याप्रकरणी३ जणांकडून १,२०० रुपये तर डेब्रिज प्रकरणी एकावर कारवाई करून ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. अशाप्रकारे एकूण १९ जणांवर केलेल्या कारवाईत २० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत स्वछता निरीक्षक किरण मारू, उदय वसावे, दीपक चव्हाण हे सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button