नाशिक : फाळके स्मारकात चोरी, संगीत कारंजा व इतर साहित्याची तोडफोड | पुढारी

नाशिक : फाळके स्मारकात चोरी, संगीत कारंजा व इतर साहित्याची तोडफोड

नाशिक : मनपाच्या ताब्यातील फाळके स्मारक येथे चोरट्याने चोरी करीत तेथून सुमारे 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास करीत तोडफोड केली आहे. या प्रकरणी मधुकर लक्ष्मण शिंदे (57, रा. आडगाव) यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

शिंदे यांच्या फिर्यादीनुसार, एप्रिल ते मे दरम्यान चोरट्याने फाळके स्मारकात चोरी केली. त्यात करमणुकीसाठी असलेल्या संगीत कारंजाची 125 मीटर लांबीची केबल, इलेक्ट्रिक पॅनलला जोडलेल्या पाच केबल व साहित्याची तोडफोड करीत नुकसान केले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button