भारताची नाळ एकत्र कुटुंब पद्धतीत : अशोक नायगावकर | पुढारी

भारताची नाळ एकत्र कुटुंब पद्धतीत : अशोक नायगावकर

तासगाव ; पुढारी वृत्तसेवा : भारताची नाळ ही एकत्र कुटुंब पद्धतीत आहे. त्याची सूत्रे महिलांच्या हातात आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले.

तासगाव येथील साने गुरूजी नाट्यगृहात नगरपालिकेतर्फे आयोजित तासगाव महोत्सव अंतर्गत ‘साने गुरुजी व्याख्यानमाला व नाट्यभक्तिरंग’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार रवींद्र रांजणे, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, आरसी इन्फ्रास्ट्रक्चरचे इंद्रजीत चव्हाण प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाल्या, शहराचा लौकिक वाढवणारा हा उपक्रम आहे. पालिकेला लागेल ते सहकार्य करू. तहसीलदार रांजणे म्हणाले, बुद्धिला खुराक देणारा उपक्रम पालिकेकडून राबवला जात आहे, हे कौतुकास्पद आहे. पोलिस निरीक्षक झाडे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

मुख्याधिकारी पाटील म्हणाले, व्याख्यानमाला यापुढेही तासगावकरांच्या सहकार्याने सुरू राहील. शहराची सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी पालिका पुढाकार घेईल.

यावेळी नायगावकर यांनी कवितांच्या माध्यमातून देशाची सध्याची परिस्थिती सांगितली. त्यांनी ‘उजाडतय’, ‘बहिणाबाईंचा बदलता जमाना’, ‘मिळवती’ अशा कवितांच्या माध्यमातून महिलांचे आपल्या आयुष्यातील स्थान, स्वयंपाकघराशी तिचे असणारे नाते, घरची कामे, ऑफिस वर्क करूनदेखील तिची कलात्मकता याचे वर्णन केले. सामाजिक कवितादेखील त्यांनी सादर केल्या.

Back to top button