पिंपरी :महावितरणमधून बोलत असल्याचे सांगून चार लाखांची फसवणूक | पुढारी

पिंपरी :महावितरणमधून बोलत असल्याचे सांगून चार लाखांची फसवणूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

महावितरण कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून एका ग्राहकाची चार लाख 3 हजार 992 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सोमवारी (दि. 23) रात्री सव्वा नऊच्या सुमारास सांगवी येथे उघडकीस आला. या प्रकरणी प्रजेश सुरेश सपकाळ (45, रा. साई अवेन्यू सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी मंगळवारी (दि. 24) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला. महावितरणच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून आरोपीने फिर्यादी यांच्या वडिलांना तुमचे लाईट बिल भरले नाही, ते मला सिस्टीममध्ये दिसत नाही, तुम्ही जर लाईट बिल भरले नाही; तर तुम्ही आम्ही तुमची लाईट लगेच कट करू, असा दम दिला. त्यावर फिर्यादी यांच्या वडिलांनी घाबरून तुम्ही लाईट कट करू नका, मी लाईट बिल ऑनलाईन भरतो, असे सांगितले.

देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर, अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

त्यांनतर आरोपीने त्यांना मोबाईलमध्ये MH-VIT-R-N Am{U -NY DESK REMOTE DESKTOP SOFTW-RE हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांच्या वडिलांनी मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँकेच्या कराड शाखेतील दोन लाख 99 हजार 993 रुपये व पिंपळे सौदागर येथील शाखेतून एक लाख तीन हजार 999 रुपये असे एकूण चार लाख 3 हजार 992 रुपये आरोपीने परस्पर हस्तांतरित करून घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तांबे करीत आहेत.

Back to top button