

नाशिक : महापालिकेला अखेर सहा महिन्यांनी दुसरे अतिरिक्त आयुक्त लाभले आहेत. या जागी मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिवपदी असलेले अशोक अत्राम हे रुजू झाले असून, त्यांची नियुक्ती चार महिन्यांपूर्वीच झाली होती. मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची डिसेंबर 2021 मध्ये अमरावती महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाली होती. त्यामुळे तेव्हापासून हे पद रिक्त होते. अत्राम यांची नियुक्ती 4 फेब—ुवारी 2022 रोजी अतिरिक्त आयुक्तपदी झाली होती. मात्र, त्यांनी पदभारच स्वीकारला नव्हता.