नाशिक : मोबाइल लोकेशनद्वारे पटवली मयताची ओळख | पुढारी

नाशिक : मोबाइल लोकेशनद्वारे पटवली मयताची ओळख

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा : 
तालुक्यातील फांगुळगव्हाण येथे एका डोंगर टेकडीवर करवंदीच्या झाडीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या अवस्थेत शुक्रवारी (दि. 20) आढळाला.

पोलिसांनी मृताच्या मोबाइल कॉलवरून फोन करून नातेवाइकांना माहिती दिली. मृत तरुणाची तीन महिन्यांपूर्वी अंबड (नाशिक) येथून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी दिली होती. दीपक बाळासाहेब सूर्यवंशी (30, रा. पळशी, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे त्याचे नाव आहे. संदीप प्रल्हाद म्हसणे (रा. फांगुळगव्हाण, ता. इगतपुरी) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांचा मित्र जावेद खान हे शुक्रवारी दुपारचे जेवण झाल्यानंतर फांगुळगव्हाण येथील डोंगरावर करवंदे तोडण्यास गेले होते. तेव्हा एका झाडाझुडपात जीर्ण अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीने झाडाला नायलॉन गुलाबी रंगाच्या दोरीने गळफास घेतलेला आढळला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पोलिस पथकाने पंचनामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला.

या घटनेत मृत व्यक्तीकडे मिळालेला मोबाइल, रुमाल, अंगावरील कपडे पोलिसांनी जप्त करून मोेबाइल कॉल तपासले असता, तो दोन फेबु्रवारीपासून घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार अंबड पोलिस ठाणे येथे नोंद आढळली. त्यावरून तपास चक्र फिरविताच मृताचा मोबाइल कॉलवरून फोन केला असता, त्याच्या नातेवाइकांनी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून, मृताची ओळख पटल्याची माहिती पोलिस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली. मृताच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावून पुढील तपासाबाबतची माहिती दिली. या घटनेबाबत पोलिस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजाराम दिवटे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश शेंडे, एएसआय रामदास जाधव, पोलिस कर्मचारी साळवे, सचिन मुकणे, सचिन बेंडकुळे, आबासाहेब भगरे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button