नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी कुंभकर्णाच्या प्रतिमेला भाला टोचुन निदर्शने

नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी कुंभकर्णाच्या प्रतिमेला भाला टोचुन निदर्शने

धुळे, पुढारी वृत्तसेवा : ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणासंदर्भात शुक्रवारी (दि.20) भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलने महाविकास आघाडीचा निषेध करीत निदर्शने केली. यावेळी प्रतिकात्मक कुंभाकर्णाच्या पोस्टरला भाला टोचुन त्याला झोपेतून जागे करण्यात आले.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शुक्रवारी (दि.20) भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीमुळे ओबीसी आरक्षण गेल्याच्या आरोप यावेळी करण्यात आला. शहरातील कराचीवाला खुंटावर हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये एक पोस्टरवर कुंभकर्णाची प्रतिमा तयार करण्यात आली. आणि या पोस्टरला भाला टोचून फोटोतील कुंभकर्णाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करणारे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार अशाच पद्धतीने कुंभकर्ण झोप येत असून त्याला या आंदोलनाच्या माध्यमातून उठवण्याचे काम केले असा असल्याचा आरोप करण्यात आला.

महाराष्ट्रातील आघाडी सरकारची अडीच वर्ष झाले तरी झोपेचे सोंग घेऊन आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मध्यप्रदेश येथे पुन्हा मध्यप्रदेश राज्य सरकार यांनी मिळवून दिले. परंतु आघाडी सरकार मात्र कुंभकरणाप्रमाणे झोपेचे सोंग घेऊन त्याबाबतीत अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. याच्या निषेधार्थ या झोपलेल्‍या सरकारला जागे करण्यासाठी भाले , ढोल-नगारे , घेऊन आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news