बारामतीचा आंबा थेट व्हाईट हाऊसमध्ये, जो बायडेन चाखणार चव! | पुढारी

बारामतीचा आंबा थेट व्हाईट हाऊसमध्ये, जो बायडेन चाखणार चव!

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निर्यात केंद्रातून आंबा थेट व्हाईट हाऊसमध्ये पोहोचणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या आंब्याची चव चाखणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर यासंबंधीची पोस्ट करत आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचले, ही आनंदाची बाब आहे. याबाबत रेनबो कंपनीचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा, असे सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कंपनीच्या सर्व्हरमध्ये घुसून घातला 19 लाखाचा गंडा; चार जणांवर गुन्हा

गुरुवारी अमेरिकेत वाॅशिंग्टन येथे भारतीय आंबा प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील आंब्याची पेटी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचणार आहे. या पेटीमध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकूर या आंब्यांचा समावेश आहे. अमेरिकेमध्ये सध्या भारतातील आंब्यांचा प्रचार सुरु आहे. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याच कार्यक्रमांतर्गत अमेरिकेचे भारतातील राजदूत करणजीत सिंग संधू हे वाॅशिंग्टन येथे आंबा प्रचार कार्यक्रमात आंब्याची पेटी व्हाईट हाऊसकडे सुपुर्त करणार आहेत. हे आंबे बारामती बाजार समितीच्या जळोची येथील फळे निर्यात केंद्रातील रेनबो इंटरनॅशनल या निर्यात संस्थेने केले आहेत.

विधवा प्रथेविरुद्ध सांगली जिल्ह्यातील पहिला ठराव बलगवडे ग्रामपंचायती कडून मंजूर

कोविड काळानंतर अमेरीकेत आज अखेर १०० टन आंबा पाठविण्यात आला आहे. विमानभाडे वाढल्याने तेथे आंबा दुप्पट म्हणजेच ५० डॉलरवर पोहचला आहे. त्यामुळे खरेदीदारांची संख्या घटली आहे. त्यातून देखील यंदा आमचे २०० ते २५० टन आंबा निर्यातीचे उद्दीष्ट आहे. बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्य पणन मंडळाने उभारलेल्या केंद्रातून निर्यात सुरु आहे. यावर्षी अमेरिका, इस्राईल, कॅनडासह ३१ देशांमध्ये आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशातील हिमायत आणि बैगनपल्ली या आंब्याच्या जातींसह महाराष्ट्रातील केशर, हापूस, मानकूर हे पाच आंब्याचा त्यात समावेश आहे. ५ एकरपेक्षा अधिक आंबा क्षेत्र असणारे शेतकरी हे त्यांच्या बागेतील आंबा निर्यात करु शकतात, असे कंपनीचे संचालक अभिजित भसाळे यांनी सांगितले.

हेही वाचा:

पुणे : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी तरूणास पाच वर्षे सक्तमजुरी

जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बोगदा कोसळला; ७ जण अडकले

कर्नाटकातील लोहखनिज निर्यातीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

 

Back to top button