साताऱ्यात कॉलेज कॅम्पसमध्ये राडा, डोके फुटेपर्यंत मारहाण | पुढारी

साताऱ्यात कॉलेज कॅम्पसमध्ये राडा, डोके फुटेपर्यंत मारहाण

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यातील डीजी कॉलेजवर शुक्रवारी दुपारी युवकांच्या दोन गटात तुफान राडा झाला. सुमारे 8 ते 10 युवक एकमेकांना भिडल्यानंतर डोके फुटेपर्यंत मारहाण झाली. कॉलेज कॅम्पसमध्ये 10 मिनिटे फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने परिसरात युवतींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना दुपारी साडेचार वाजता घडली. एकमेकांना खुन्नसने पाहण्याच्या कारणातून दोन गटामध्ये वादावादीला सुरुवात झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयितांनी दगड व इतर हत्यारे काढून दुसर्‍या गटावर चाल केली. कॉलेज कॅम्पसमध्ये घडलेल्या या घटनेने युवतींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. भितीपोटी अनेकांनी तेथून पळ काढला. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर एकाचे डोके फुटले व तो रक्तबंबाळ झाला.

हेही वाचा

Back to top button