नाशिकच्या म्हसरूळ परिसरात तरुणाची हत्या, तर एकाचा पळून गेल्याने वाचला जीव

नाशिकच्या म्हसरूळ परिसरात तरुणाची हत्या, तर एकाचा पळून गेल्याने वाचला जीव

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी परिसरात चोऱ्या, दरोडे आणि लाचखोरी पाठोपाठ खुनाच्या घटनाही वाढल्या असून, आडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या घटनेला २४ तास उलटत नाही तोच म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची हत्त्या झाल्याची घटना घडली आहे.

म्हसरुळ परिसरातील दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोल पंपाजवळ बुधवारी (१८) रात्री उशिरा २४ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. यश रामचंद्र गांगुर्डे असे मृताचे नाव आहे. त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात यशचा मित्र घटनास्थळाहून पळून गेल्याने वाचला आहे.

पूर्ववैमनस्यातून ही हत्त्या झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, पोलिसांच्या वतीने पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी आडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळवाडी शिवारात विवाहितेची हत्त्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेपाठोपाठ म्हसरूळ परिसरात तरुणाची हत्त्या झाल्याने पंचवटी परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्यासाठी पोलिसांना आता 'ऍक्शन मोड'वर येऊन धडाकेबाज कारवाया कराव्या लागणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news