आकाशातून पडल्या गूढ, गोलाकार वस्तू | पुढारी

आकाशातून पडल्या गूढ, गोलाकार वस्तू

अहमदाबाद : गुजरातच्या पाच जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये आकाशातून गोलाकार वस्तू पडल्याचा दावा करण्यात आला आहे. चेंडूच्या आकाराच्या या वस्तू पाहून स्थानिक लोक चकीत झाले आहेत. चिनी प्रक्षेपण वाहनाचे हे अवशेष असू शकतात असे अमेरिकेतील खगोल संशोधकांनी म्हटले आहे. आता या वस्तूंची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल.

सर्वात प्रथम 12 मे रोजी आनंदच्या भालेज, खंभोलज आणि रामपुरा गावात असे गोळे पडल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर 14 मे रोजी खेडा जिल्ह्यातील चकलासी गावातील धातूची अशी चेंडूसारखी वस्तू आकाशातून कोसळल्याचे सांगण्यात आले. वडोदरामध्येही अशीच घडना घडली. या वस्तूंमुळे कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. वडोदरा ग्रामीणचे एसपी रोहन आनंद यांनी सांगितले की या सर्व वस्तू फोरेन्सिंग विज्ञान संचालयाकडे पाठवल्या जातील व तिथेच त्यांच्याबाबतचे रहस्य उलगडेल.

पाण्याखालील लग्‍नासाठीही ‘वेडिंग डेस्टिनेशन’!

एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले की या वस्तू उच्च घनत्व असलेल्या धातूपासून बनवलेल्या आहेत. अशा वस्तूंचा वापर रॉकेटसाठी केला जात असतो. या चेंडूचा आकार पाच किलो आहे. अमेरिकेतील हार्वर्ड स्मिथसोनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे खगोलशास्त्रज्ञ जॉनथन मॅक्डॉवेल यांनी ट्विट करून म्हटले आहे की हे चीनच्या ‘चांग झेंग 3 बी सीरियल वाय 86’चे अवशेष असू शकतात.

आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलअली लाऊड स्पीकरबाबतीत काय सांगतायत?

Back to top button