नाशिक : जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलाचा रस्त्यावर आपटून खून | पुढारी

नाशिक : जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलाचा रस्त्यावर आपटून खून

येवला : पुढारी वृत्तसेवा : तुम्ही माझा चांगल्या मुलीसोबत विवाह करून का दिला नाही, असा दारूच्या नशेत जाब विचारणाऱ्या मुलाचा जन्मदात्या पित्यानेच खून केला. ही घटना कातरणी (ता. येवला) येथे सोमवारी (दि.१५) घडली. संदीप बाळासाहेब आगवणे (वय ३२) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर बाळासाहेब आगवणे असे खून करणाऱ्या पित्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संदीप बाळासाहेब हागवणे याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्याची पत्नी त्याला काही दिवसांपूर्वी सोडून गेली होती. सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास संदीप हा दारू पिऊन आला. तुम्ही माझा चांगल्या मुलीसोबत विवाह करून का दिला नाही. या कारणावरून वडिलांशी वाद घालू लागला. या वादाचे पुनर्वसन हाणामारीत झाले. यानंतर बाळासाहेब आगवणे यांनी संदीप यास डोक्यावर उचलून रस्त्यावर आपटले. त्यामुळे डोके फुटल्याने संदीपचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बाळासाहेब आगवणे यास अटक करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button