याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, निफाड काथरगाव मार्गावरील वाघ वस्तीवर डॉ. किरण वाघ, राजाराम वाघ आणि काशिनाथ वाघ हे आपल्या कुटुंबासह राहतात. याच ठिकाणी त्यांनी आपल्या शेतातील उत्पादित केलेला कांदा साठवण्यासाठी कांदाचाळ बांधलेल्या आहेत. सध्या कांद्याला पुरेसा भाव मिळत नसल्याने त्यांनी जवळपास 25 ट्रॅक्टर भरून कांदा चाळीमध्ये साठवलेला होता.