‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम’मध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना करिअरची संधी

‘बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम’मध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना करिअरची संधी
Published on
Updated on
गणेश खळदकर
पुणे ; पुढारी वृत्तसेवा:  ई-वाहनांचा आत्मा बॅटरी (विद्युतघट) असून, तिची कार्यक्षमता आणि बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम अर्थात बीएमएसवर फार मोठे संशोधन होणे गरजेचे आहे. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना फार मोठी संधी उपलब्ध झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
सध्या दुचाकी, चारचाकी ई-वाहनांची जोरदार खरेदी लोक करत आहेत. त्यामुळे देशात भविष्यात ई-वाहनांचे युग अवतरणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.   लिथियम आयन बॅटरी  पुनःप्रभारासाठी अत्यंत कार्यक्षम ठरते. लिथियम हा अत्यंत हलका धातू असून त्याची इलेक्ट्रोकेमिकल क्षमता जास्त आहे. त्यामुळे ऊर्जेची घनता जास्तीत जास्त आहे. त्यामुळे सध्या लिथियम बॅटरी जास्त वापरली जाते. भविष्यात ई-वाहने चालवायची असतील तर बीएमएसवर जास्तीत जास्त संशोधन होण्याची गरज आहे.
ई-वाहनांच्या आगीच्या घटनांमुळे कार्यक्षम बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिमची गरज अधोरेखित होते. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम औष्णिक असमतोल थोपवते. त्यातून अशा घटना टाळता येतील. यासाठी बॅटरीचे जास्तीत जास्त परीक्षण आवश्यक आहे. शासन स्तरावर आता यासंबंधीचे नियम कडक केले जात आहेत. बॅटरी आणि वाहननिर्माते यांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
                                                                                                   – शेखर मलानी, संचालक,
                                                                                                  डिवाइस इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड
ई-वाहनांचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे बॅटरी. यातील सगळ्यात महत्त्वाचे आव्हान म्हणजे बॅटरीची सुरक्षितता आणि किंमत. सध्या वापरातील लिथियम आयन बॅटरी ही अस्थिर असल्याने त्यासाठी सर्वसमावेशक बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिमची आवश्यकता आहे. संशोधनातून बॅटरीची किंमत कमी करता येईल. त्यामुळे सध्या बॅटरी संशोधनात अनेक संधी उपलब्ध आहेत.
                                                           – प्रो. डॉ. गणेश काकांडीकर, संकुल प्रमुख, यंत्र अभियांत्रिकी, एमआयटी

बॅटरीसंबंधी असलेली आव्हाने

  •  बॅटरीचे आयुष्य व सुरक्षितता
  •  बॅटरीची किंमत कमी करणे
  •  बॅटरीसाठी नवीन धातूंचे विकल्प
  •  बॅटरीची कार्यक्षमता वाढविणे
  •  चार्जिंगसाठीचा वेळ कमी करणे

बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिमचे कार्य

  •  विद्युत शक्ती व विद्युतदाब नियंत्रित करणे
  •  डिजिटल व अ‍ॅनालॉग आउटपुट कंट्रोल्
  • बॅटरी हेल्थ मॉनिटरिंग
  • बॅटरीतील प्रगत दोष शोधणे
  • आवाजाचे व्यवस्थापन

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news